पुढारी ऑनलाईन डेस्क : Red Card In Cricket : कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी त्रिनबागो नाइट रायडर्सचा फिरकीपटू सुनील नरेन क्रिकेटमध्ये रेडकार्ड मिळवणारा पहिला खेळाडू बनला. रविवारी कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL 2023)च्या सामन्यादरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली. स्लो ओव्हर रेटसाठी मैदानी पंचांनी नरेन याच्यावर कारवाई करण्यात आली.
सीपीएल 2023 च्या चालू हंगामात रेडकार्डचा (Red Card In Cricket) नियम लागू करण्यात आला आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्स या संघाने सेंट किट्स अँड नेव्हिस प्रिटोरियस संघाविरुद्ध निर्धारित वेळेत 20 षटके टाकली नाहीत. यानंतर 19 षटकांचा खेळ संपताच त्यांच्या खेळाडूला रेडकार्डचा (Red Card In Cricket) सामना करावा लागला. अशा स्थितीत त्रिनबागो संघाचा कर्णधार पोलार्डने सुनील नरेनला मैदानाबाहेर जाण्याचे संकेत दिले. यानंतर मैदानावर त्यांचे 10 खेळाडू उरले.
या सामन्यात त्रिनबागोचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 178 धावा केल्या. कर्णधार शेरफान रदरफोर्डने (62) सर्वात मोठी खेळी केली. यानंतर त्रिनबागोने 17.1 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 6 विकेट्स राखून जिंकला.
डावातील शेवटच्या षटकामध्येच पंचांना रेडकार्डचा वापर करतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाने वेळेत षटके फेकली नाहीत तर, मैदानी पंचांना त्या संघातील खेळाडूला रेडकार्ड दाखवण्यची मुभा असणार आहे.
स्लो-ओव्हर रेट केवळ गोलंदाजी करणाऱ्या संघामुळेच होतो असे नाही. काही वेळेस फलंदाजांचीही चूक यास कारणीभूत असते. त्यामुळे फलंदाजांमुळे षटके टाकण्यास विलंब झाल्यास त्यांच्याकडूनही दंड आकरला जाणार आहे. अशा परिस्थितीत फलंदाजाला वॉर्निंग देईल. मात्र, फलंदाजांकडून चुकांची पुनरावृत्ती झाल्यास ५ धावांचा फटका बसणार आहे. (Red Card In Cricket)