Recruitment in ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर फोर्समध्ये बंपर भरती; 23 नोव्हेंबरपासून करता भरता अर्ज

Recruitment in ITBP
Recruitment in ITBP

पुढारी ऑनलाईन: Recruitment in ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर फोर्समध्ये (ITBP) कॉन्स्टेबल / ट्रेड्समन पदांसाठी २८७ पदांची भरती (Recruitment in ITBP) जाहीर करण्यात आली आहे. या पदांसांठी पात्र उमेदवारांना ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना 23 नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या पदांसाठी २२ डिसेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

Recruitment in ITBP: जाणून  काय असेल पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील

रिक्त जागा तपशील

कॉन्स्टेबल (शिंपी): 18 पदे
कॉन्स्टेबल (माळी) : 16 पदे
कॉन्स्टेबल (चांभार): 31 पदे
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी): 78 पदे
कॉन्स्टेबल (धोबी) : 89 पदे
कॉन्स्टेबल (न्हावी): 55 पदे

 पात्रता

सर्व पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा

कॉन्स्टेबल (शिंपी, माळी आणि चांभार): 18 ते 23 वर्षे
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी, धोबी आणि न्हावी): 18 ते 25 वर्षे

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, लेखी चाचणी, ट्रेंड चाचणी आणि वैद्यकीय चाचणी / पुनरावलोकन वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असेल.

अर्ज फी

या पदांसाठी अर्ज करताना 100/- रू फि असणार आहे. SC, ST, महिला आणि माजी सैनिकांच्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिक संबंधित तपशीलासाठी उमेदवार ITBP (Recruitment in ITBP)  च्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news