तुळशीच्या विवाहामुळे तुळशीचा भाव वधारला | पुढारी

तुळशीच्या विवाहामुळे तुळशीचा भाव वधारला

नवी मुंबई; पुढारी वार्ताहर : तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर रोपवाटिकांमधील तुळशीच्या रोपांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे रोपांच्या किमतीतही वाढ झाली असून नेहमीपेक्षा दुप्पट किमतीने रोपांची विक्री होत आहे.

दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे तुळशीचे लग्न. या दिवशी खर्‍या अर्थाने दिवाळीची सांगता होते. तुळशी विवाहानंतर आपल्याकडे लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. म्हणून सध्या तुळशीच्या लग्नाची लगबग सुरू आहे. शनिवारपासून तुळशी विवाहाला प्रांरभ झाला असून मंगळवारी तुळशी विवाह समाप्ती हाणार आहे. या पार्श्वभूमीवर तुळशी विवाहासाठी म्हणून तुळशीच्या रोपांनाही मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने रोपांच्या किमतीही वधारून जवळपास दुप्पट झाल्या आहेत.

नवी मुंबईतील ठाणे- बेलापूर रोडलगतच्या नर्सरी काळ्या, पांढर्‍या, कापुरी अशा विविध तुळशींनी फुलून गेल्या आहेत. तुळशीचे हे सर्व प्रकार पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पातून मागवतात. दिवाळीच्या दिवसांत दरवर्षीच तुळशीच्या रोपांना चांगली मागणी असल्याचे नर्सरी चे मालक सुरेश नाईक यांनी सांगितले. तुळशीच्या किमतीत साधारणपणे वाढ होत नाही. मात्र, रोपांची मागणी असल्यामुळे भाव चढवून सांगण्यात येतात. तुळशीच्या आकारानुसार तुळशीच्या किमंती आहे. 20 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत
तुळशीच्या किमती आहेत.

Back to top button