IPL Play Offs : आरसीबीच्या विजयाने मुंबईचे वाढले टेन्शन

IPL Play Offs : आरसीबीच्या विजयाने मुंबईचे वाढले टेन्शन
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये गुरुवारी सनरायजर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने नेट रनरेटमध्ये चांगली सुधारणा करताना पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेताना मुंबई इंडियन्सला मागे टाकले. (IPL Play Offs)

हेन्रीच क्लासेनने शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने 5 बाद 186 धावा केल्या. क्लासेन आणि एडन मार्करम यांनी 76 धावांची (50 चेंडू) भागीदारी केली. क्लासेनने 51 चेंडूंत 104 धावा केल्या आणि त्यात 8 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता. हॅरी ब्रुकने नाबाद 27 धावा करताना हैदराबादला 5 बाद 186 धावांपर्यंत पोहोचवले. (IPL Play Offs)

प्रत्युत्तरात विराट कोहली (100) व फाफ डू प्लेसिस (71) यांनी पहिल्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी करून आरसीबीचा विजय पक्का केला. बेंगलोरने 19.2 षटकांत 2 बाद 187 धावा करून सामना जिंकला. आरसीबीने 13 सामन्यांत 7 विजयांसह 14 गुणांची कमाई केली आहे. मुंबई इंडियन्स -0.128 नेट रनरेटसह पाचव्या क्रमांकावर सरकला आहे. आरसीबीचा नेट रनरेट +0.180 असा झाला आहे.

आरसीबीला शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्स (गतविजेते प्ले-ऑफमध्ये दाखल) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे.

मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे आणि तो मुंबई इंडियन्सने मोठ्या फरकाने जिंकल्यास आरसीबीवर दडपण येऊ शकते. चेन्नई सुपर किंग्ज व लखनौ सुपर जायंटस् यांचे प्रत्येकी 15 गुण आहेत. सीएसकेविरुद्ध दिल्ली आणि लखनौविरुद्ध केकेआर या लढतीवर अन्य संघांचे गणित अवलंबून असणार आहे.

आरसीबीने आणि मुंबई इंडियन्सने शेवटची मॅच जिंकल्यास त्यांचे प्रत्येकी 16 गुण होतील. अशावेळी नेट रनरेट निर्णायक ठरेल. त्याआधी सीएसके आणि लखनौ यांनी त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकला, तर मुंबई आणि आरसीबी यांच्यापैकी ज्याचा नेट रनरेट जास्त तो प्ले-ऑफमध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र ठरेल. मुंबईने मात्र शेवटची मॅच गमावली अन् आरसीबीने सामना जिंकला, तर ते प्ले-ऑफ खेळतील.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news