RCB vs LSG : बेंगलोर आज लखनौविरोधात विजयाची ‘हॅटट्रीक’ करणार का?

RCB vs LSG
RCB vs LSG
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स आज (दि.१०) आयपीएल २०२३ स्‍पर्धेतील १५ व्या सामन्यात आमने-सामने असणार आहेत. हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात बेंगलोरचे फलंदाजी लखनौवर भारी पडणार की लखनौचे गोलंदाज त्यांना रोखणार? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. बेंगलोरचा मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ८१ धावांनी धुव्वा उडवला होता. (RCB vs LSG)

चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबी पुनरागमन करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल. शेवटच्या षटकांत फलंदाजी करताना बेंगलोरच्या फटकेबाजी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे अंतिम षटकांमधील फलंदाजी आरसीबीसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरसीबीच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या ८९ धावांवर ५ विकेट्स पटकावल्या होत्या. मात्र, तरीही नाईट रायडर्सनी २०४ धावांचा टप्पा गाठला होता. मुंबई विरुद्धच्या सामन्यातही आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली होती. (RCB vs LSG)

लखनौची गोलंदाजी दमदार (RCB vs LSG)

लखनौने मागील सामन्यात सनराईजर्स हैदराबादचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला होता. लखनौचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने आत्तापर्यंत ६ विकेट्स पटकावल्या आहेत. कुणाल पंड्या आणि अमित मिश्रानेही प्रभावी गोलंदाजी केली आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये मार्क वुडने आत्तापर्यंत ८ विकेट्स आपल्‍या नावावर केल्‍या आहेत.

आकडे काय सांगतात? (RCB vs LSG)

बेंगलोर आणि लखनौचा संघ आत्तपर्यंत २ वेळेस आमने-सामने आले आहेत. हे दोन्ही सामने आयपीएल २०२२ मध्ये खेळवण्यात आले. ग्रुप स्टेजच्या सामन्यात बेंगलोरने लखनौचा १८ धावांनी पराभव केला होता. यानंतर खेळवण्यात आलेल्या एलिमिनेटरमध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले होते. या सामन्यातही बेंगलोरने लखनौचा १४ धावांनी धुव्वा उडवला होता. (RCB vs LSG)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news