Google Pay अकाउंटमध्ये ‘धन वर्षा’, यूजर्सना मिळाले ८८ हजार, जाणून घ्या काय आहे नेमकं कारण? | पुढारी

Google Pay अकाउंटमध्ये 'धन वर्षा', यूजर्सना मिळाले ८८ हजार, जाणून घ्या काय आहे नेमकं कारण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अकाउंटमध्ये अचानक कुठूनतरी येऊन पैसे पडले तर आपण त्याचा शोध घेतो. Google Pay यूजर्सना असाच अनुभव आला आहे. जेव्हा त्यांच्या Google Pay अकाउंटमध्ये अनपेक्षितरित्या पैसे आल्याची नोंद झाली. काही यूजर्सच्या अकाउंटमध्ये सुमारे ८८ हजारांपर्यंत पैसे जमा झाले. पण पैसे मिळाल्याचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. कारण कंपनीने काही वेळानंतर हे पैसे मागे घेतले.

/r/GooglePixel subreddit वरील यूजर्सना असे सूचित केले गेले की ‘dogfooding the Google Pay remittance experience’ साठी हे पैसे येत आहेत. ‘डॉगफूडिंग’ हा शब्द एखाद्या कंपनीचे कर्मचारी नवीन वैशिष्ट्य किंवा सेवा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यापूर्वी त्याची चाचणी घेतात.

काही यूजर्सच्या अकाउंटमध्ये सुमारे १,०७२ डॉलरपर्यत रक्कम आली. काही यूजर्सनी म्हटले की ही रक्कम जमा झाल्यानंतर Google द्वारे त्यांच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधला गेला. पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा झाल्याचे काही यूजर्सनी ट्विट करत म्हटले आहे. Google ने यूजर्सना कळवले की ते पेमेंट परत घेण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, Google ने हे पैसे यूजर्सच्या अकाउंटमध्ये का जमा केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही समस्या Google Pixel यूजर्सपुरती मर्यादित होती की इतर Android डिव्हाइसेसवरदेखील होती याची माहिती मिळालेली नाही.

एक परदेशी पत्रकाराने ट्विट करत म्हटले आहे की, असे वाटते की Google Pay त्यांच्या सर्व यूजर्सना मोफत पैसे देत आहे. मी जेव्हा गुगल पे ओपन केले तेव्हा लक्षात आले की माझ्याकडे रिवॉर्ड्समध्ये ४६ डॉलर आहेत, असे म्हणत त्यांनी हे कसे पाहावे याची पद्धतीही सांगितली. गुगल पे ओपन करा आणि डिल्स टॅबवर स्वाइप करा. तुम्ही त्याच्या टॉपवर चेक करु शकता की तुम्हाला कोणते रिवॉर्डस्‌ मिळाले आहेत का?. मला वाटते की हे काहीतरी चुकीने झाले आहे. त्याशिवाय अनेक Reddit यूजर्सने त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे. एकाने म्हटले आहे की त्याच्या अकाउंटमध्ये १,०७२ अमेरिकी डॉलर जमा झाले. तर एकाने २४० डॉलर मिळाल्याचे नमूद केले आहे.

हा घोळ लक्षात येताच गुगलने यूजर्सना पाठवलेले पैसे परत घेतले. कंपनीने या चुकीबद्दल मेलदेखील पाठविला आहे. हे चुकीने झाले आहे. ज्यांनी हे पैसे खर्च केले आहेत त्यांनी हे पैसे परत करायला हवेत, असे कंपनीने म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button