डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती ई-कॉमर्स वेबसाईट्स सेव्ह करणार नाहीत : RBIचे कडक निर्बंध

डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती  ई-कॉमर्स वेबसाईट्स सेव्ह करणार नाहीत : RBIचे कडक निर्बंध
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रेडिट आणि डेबिट कार्डची कोणतीही माहिती ऑनलाईन शॉपिंग आणि इतर वेबसाईट सेव्ह करू शकणार नाहीत. थेट माहिती सेव्ह न करता, टोकनच्या स्वरूपात ही माहिती सेव्ह असेल. हा बदल १ ऑक्टोबरपासून अंमलात येणार आहे.

ग्राहकांच्या अपरोक्ष क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची माहिती हॅक करून त्यावरील रक्कम काढण्याचे जे प्रकार घडत आहेत, त्याला निर्बंध घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. (RBI's card tokenization norms to change credit, debit card rules from1 Oct)

कार्ड ऑन फाईल टोकनायझेशन पद्धत स्वीकारण्यात येणार

नव्या सिस्टमला कार्ड ऑन फाईल टोकनायझेशन असे म्हटले जाते. भविष्यातील व्यवहारांसाठी ऑनलाईन शॉपिंग तसेच इतरही वेबसाईट ग्राहकाच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती सेव्ह करून ठेवतात. ही पद्धत बंद करून आता कार्ड ऑन फाईल टोकनायझेशन ही पद्धत स्वीकारण्यात येणार आहे. ही अंमलबजावणी यापूर्वी ३० जूनपासून होणार होती, त्यानंतर याला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

टोकन कसे बनते?

डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या मदतीने कोणतेही ऑनलाईन पेमेंट करताना संबंधित साईट टोकन बनवण्याची परवानगी ग्राहकाकडे मागेल. एकदा अशा साईटवर कार्ड नोंद केल्यानंतर टोकन तयार होईल. टोकन हा एक प्रकारचा कोड असणार आहे. असे टोकन बनवण्यासाठी ॲडिशनल फॅक्टर ऑथिंटेकेशनचा (AFA) वापर केला जाणार आहे. एकदा टोकन बनल्यानंतर याचा उपयोग भविष्यातील वापरासाठी उपयोग होईल. अर्थात कोणताही व्यवहार करताना CVV आणि OTP या स्टेप्स असणार आहेतच.

नव्या नियमामुळे कोणतीही ई-कॉमर्स वेबसाईटवर कार्डचे डिटेल्स सुरक्षित राहतील. कार्डचे डिटेल्स प्लॅटफॉर्मवर सेव्ह होणार नाहीत, तसेच ते विक्रेत्याशी शेअरही केले जाणार नाही. अशा ई- कॉमर्स साईटवर कोणत्याही प्रकारे कार्डचे डिटेल्स, कोणत्याही प्रकारे सेव्ह करता येणार नाहीत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news