RBI fines: रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील दोन बँकांना ठोठावला दंड

RBI fines: रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील दोन बँकांना ठोठावला दंड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: रिझर्व्ह  बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. यात पुणे जिल्ह्यातील पिंपरीची इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँक आणि मुंबईतील एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक या दोन बँकांचा समावेश आहे. यातील इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँकेला तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेला १३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI fines)

एसव्हीसी को-ऑपरेटीव्ह बँकेच्या बाबतीत १९ सप्टेंबर २०२३ रोजीच्या एका आदेशाद्वारे बँकेला १३.३० लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. ठेव खात्यांच्या देखरेखी संदर्भात रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे एसव्हीसी बॅंकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे. तर २५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या एका आदेशाद्वारे इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँकेला तीन लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. उत्पन्न ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण, विविध तरतूदी आणि इतर काही बाबींचे पालन न केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. (RBI fines)

बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदींनुसार रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत रिझर्व्ह बँकेकडुन दोन्ही बॅंकांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (RBI fine)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news