Ravindra Jadeja : ‘नाडा’तर्फे जडेजाची सर्वाधिक चाचणी!

Ravindra Jadeja : ‘नाडा’तर्फे जडेजाची सर्वाधिक चाचणी!
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाकडून यंदा जानेवारी ते मे या कालावधीत तीनवेळा डोप चाचणीसाठी नमुने घेण्यात आले असून यामुळे या कालावधीत तो सर्वाधिक सॅम्पल घेतला जाणारा खेळाडू ठरला आहे. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) ही आकडेवारी जाहीर केली आहे. (Ravindra Jadeja)

यंदा या पाच महिन्यांच्या कालावधीत 55 क्रिकेटपटूंकडून डोप चाचणीसाठी 58 नमुने घेण्यात आले. या 55 क्रिकेटपटूंत महिला व पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक नमुने कोणतीही स्पर्धा किंवा सामने सुरू नसताना घेतले गेले होते, असे 'नाडा'ने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे. (Ravindra Jadeja)

'नाडा'ने 2021 व 2022 पेक्षाही यंदा पहिल्या पाच महिन्यांतच अधिक नमुने घेतल्याचे देखील यामुळे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 2021 मध्ये 54 तर 2022 मध्ये 60 नमुने घेण्यात आले होते.

यंदा पहिल्या पाच महिन्यांतच 58 नमुने घेतले गेले असून यंदा सर्वोच्च नमुन्यांचा विक्रम होईल, हे जवळपास स्पष्ट आहे. यंदा पाच महिन्यांच्या कालावधीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांची एकदाही चाचणी घेतली गेलेली नाही. यापैकी कोहलीची 2021 व 2022 मध्येही चाचणी झाली नाही. 2022 मध्ये महिला क्रिकेटपटूंकडून 20 नमुने घेतले गेले.

हार्दिक पंड्याकडून चाचणीसाठी एप्रिलमध्ये मुत्रल नमुने घेण्यात आले होते. स्पर्धा सुरू असताना 20 नमुने घेण्यात येतात, त्यात आयपीएल स्पर्धेवेळी सर्वाधिक भर देण्यात आला होता. जडेजाचे तिन्ही नमुने मुत्रल स्वरूपात कोणतीही स्पर्धा सुरू नसताना 19 फेब—ुवारी, 26 मार्च, 26 एप्रिल रोजी घेण्यात आले. थंगसरु नटराजनचे दोन नमुने दि. 27 एप्रिलला घेण्यात आले.

डोप चाचणीसाठी नमुने घेण्यात आलेले महत्त्वाचे भारतीय खेळाडू : सूर्यकुमार यादव, के.एल. राहुल, इशान किशन, मोहम्मद सिराज, दीपक चहर, मयंक अगरवाल, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, दिनेश कार्तिक, यशस्वी जैस्वाल, अम्बाती रायुडू, पीयुष चावला, मनीष पांडे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news