dry brushing : ड्राय ब्रशिंगने उजळा चेहरा | पुढारी

dry brushing : ड्राय ब्रशिंगने उजळा चेहरा

प्रदूषण, तणाव, जीवनशैली आणि वयवृद्धी या आणि इतर समस्यांमुळे चेहर्‍याची त्वचा संवेदनशील होते. फेशियल ड्राय ब्रशिंगमुळे त्वचेला तजेला मिळतोच तसेच ती प्रफुल्लित होते. ड्राय ब्रशिंग चेहर्‍यावर कशा पद्धतीने वापरावे ते पाहूया. (dry brushing)

त्वचेतून विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी स्पेशल फेशियल ब्रशची खूप मदत होते. हे ब्रश चेहर्‍याच्या मृतपेशी आणि त्वचाछिद्रे काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. ब्रशिंग रोज करू शकतो किंवा दिवसातून दोनवेळाही करू शकता. चेहर्‍यावर ब्रशिंग करताना हळुवारपणाने करावे. गळा आणि छातीपर्यंतही ब्रशिंग करता येते. (dry brushing)

चेहर्‍यावर वापरण्याचे हे ब्रश नैसर्गिक आणि सिंथेटिक फायबर या दोन्हीपासून तयार केले जातात. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांच्यासाठी सिलिकॉनपासून तयार झालेले ब्रश चांगले असतात. हायब्रिडपासून तयार केलेले ब्रश साधारण आणि तेलकट त्वचेसाठी उपयुक्त असतात. ब्रशमध्ये जीवाणू लवकर तयार होतात. त्यामुळे ब्रश साफ न केल्यास त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे ब्रश रोजच्या रोज साफ करून जंतूविरहित ठेवला पाहिजे. फेशियल ब्रशिंगचा वापर करणे उत्तमच आहे; पण प्रत्येकाच्या त्वचेला ते सूट करतील, असेही नाही.

या ब्रशचा वापर केल्यानंतर चेहर्‍यावर लालसरपणा किंवा पुरळ येत असेल, तर वापर करणे बंद करावा. ब्रश कोणताही असला तरी तो एकमेकांचा ब्रश वापरू नये. हा ब्रश वापरताना एक्सफॉलिएटिंग स्क्रबचा वापर करू नये.

हे ही वाचा:

3D Dress Fashion : ‘थ्री डी’ ड्रेस कधी घातला आहे का? जाणून घ्या लेटेस्ट फॅशन

वेस्टर्न ड्रेसेसला एम्ब्रॉयडरी, जाणून घ्या नवीन फॅशन

Back to top button