‘साठी बुद्धी नाठी..!’ : रवी शास्त्रींच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजच्‍या पिढीला रवी शास्‍त्री यांची  ओळख क्रिकेट कमेंट्री (समालोचक) स्‍टार( अशी ओळख आहे. टीम इंडियाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी हॉटी आहे, मी खोडकर आहे आणि मी साठ वर्षांचा आहे.' या पोस्टमुळे त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

शास्‍त्रींच्‍या फाेटाेवर कमेंटचा पाऊस

"हे रवी शास्त्रींच्या नवीन जाहिरातीचे दृश्य आहे किंवा त्यांचे खाते हॅक झाले आहे," अशी कमेंट काहींनी केली आहे.. रवी शास्त्रींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये तो निळ्या रंगाचा झगा परिधान केलेला दिसत आहे. 61 वर्षीय रवी शास्त्री सध्या आयपीएल 2024 मध्ये समालोचक आणि तज्ञ म्हणून काम करत आहेत. दरम्यान, चाहते त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.

वास्तविक रवी शास्त्री यांनी त्यांच्या माजी सहकार्याला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मी हॉटी आहे, मी खोडकर आहे आणि मी साठ वर्षांचा आहे." या पोस्टमुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या पोस्टनंतर काहींनी म्‍हटलं आहे की, काहीतरी गडबड आहे, कदाचित हे शास्त्रींच्या नवीन जाहिरातीचे दृश्य आहे किंवा त्यांचे खाते हॅक झाले आहे.

काही तासांमध्ये 1.1 लाखाहून अधिक व्ह्यूज

X वर ही पोस्ट व्‍हायरल हाेताच काही तासांमध्‍ये त्याला 1.1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्ह्यूजमध्‍ये सतत वाढ हाेत आहे. याशिवाय 1000 हून अधिक लोकांनी या फाेटाेंना लाईक केले आहे.

रवी शास्त्री यांनी 2017 पासून 2021 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक हाेते. T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. 1981 ते 1992 या कालावधीत टीम इंडियाकडून खेळताना शास्त्री यांनी 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी एकूण 7000 आंतरराष्ट्रीय धावा आणि 272 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. 1992 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर शास्त्री यांनी 1995 मध्ये टीव्हीवर समालोचक म्हणून पदार्पण केले. तेव्हापासून शास्त्री समालोचकाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news