रत्‍नागिरी : मंगला एक्‍स्‍प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; कोकण रेल्वेचा खोळंबा, प्रवासी त्रस्त

file photo
file photo

खेड; पुढारी वृत्तसेवा कोकण रेल्वे मार्गावर आज (रविवार) सकाळी १०.१७ वाजता खेड तालुक्यातील कळंबणी ते दिवाणखवटी या स्थानका दरम्यान नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये बिघाड झाला. त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेनंतर दुसरे इंजिन जोडून १२.३७ वाजता एक्सप्रेस मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

दरम्‍यान मंगला एक्‍स्‍प्रेसचे इंजिन मध्ये बिघाड झाल्‍याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली. सकाळी १०.१७ वाजता केरळ राज्यातील एरनाकुलम ते नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन या स्थानकादरम्यान धावणारी (१२६१७) ही मंगला सुपरफास्ट एक्सप्रेस इंजिन मध्ये बिघाड झाल्याने खेड तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ सुमारे दोन तास थांबली होती. यामुळे मुंबई सीएसएमटी ते मडगाव या दरम्यान धावणारी मांडवी एक्सप्रेस व दिवा ते सावंतवाडी जाणारी सिंधुदुर्ग एक्सप्रेस या दोन्ही गाड्या करंजाडी स्थानकात रखडल्या.

रविवार असल्यामुळे मुंबईतून गावी व गावातून मुंबईत जाणाऱ्या दोन्ही बाजूकडील प्रवाशांची गर्दी सर्वच रेल्वे स्थानकांवर झाली होती. दुसरे इंजिन जोडून १२.३७ वाजता मंगला एक्सप्रेस मार्गस्थ झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news