Rasika Sunil : रसिका लई भारी! खण साडीत सुंदर पिचवाई वर्कमधील लूक व्हायरल

rasika sunil
rasika sunil
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझी नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजेच रसिका सुनील हिने साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. तिचे (Rasika Sunil) खण साडीतील सुंदर फोटोज व्हायरल झाले आहेत. नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणारी रसिका आपल्या चाहत्यांसाठी नवनवे अपडेट्स देत असते. आपले स्वत:चे तसेच पती आदित्य बिलागीसोबतचे फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोज शेअर करत असते. नुकताच ती आदित्यसोबत टोरँटो, कॅनडामध्ये व्हेकेशन एन्जॉय करून आलीय. (Rasika Sunil)

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून रसिका सुनील ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. ती शिक्षणासाठी म्हणून परदेशात गेली होती. तेथ्‌ तिची आदित्य बिलागीशी ओळख झाली. सुरुवातीला मैत्री आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. अखेर दोघेही लग्नबंधनात अडकले.

काही दिवसांपूर्वी ब्लॅक शॉर्ट वनपीसमध्ये तिने गॉगल घालत मस्त फोटो शेअर केला होता. आता तिने खण साडीत फोटोशूट केला आहे. साडीच्या पदरावर सुंदर नक्षी आहे. तिने या नक्षीकामाला पिचवाई वर्क असे म्हटलं आहे. तिने या साडीला When Khun meets Pichwai… अशी कॅप्शन दिलीय.

रसिकाच्या साडीतील फोटोजना चाहत्यांकडून भरभरून कमेंट् मिळत आहेत. तिच्या सौंदर्याचे खूप कौतुकही केले जात आहे. सुंदर खण साडी, केसात गजरा आणि मनमोहक हास्याने रसिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये चाहत्यांकडून रसिकाला काय ती साडी… काय तो गजरा… काय ती हसू….! एकदम ओके मध्ये….❤️?, Beauty queen ❤️❤️, हर लम्हा मुस्कुराता है, तेरी मुस्कराहट के साथ??, Mind Blowing?❤️?, Kiti chan distes g tu??, लय भारी रसिका ही पैठणी नऊवारी त आली, Amazing❤️❤️❤️❤️❤️ अशा कमेंट्ट्‌  मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news