Rashmika Mandanna : रश्मिकाला बॉलिवूड एन्ट्री पूर्वीच मोठा झटका! टायगरसोबतच्या चित्रपटाला स्थगिती

Rashmika Mandanna : रश्मिकाला बॉलिवूड एन्ट्री पूर्वीच मोठा झटका! टायगरसोबतच्या चित्रपटाला स्थगिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rashmika Mandanna : बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाहीयत. शमशेरा, लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन यांसारखे बिग बजेट आणि मोठी स्टारकास्ट असताना हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अपयशी ठरले. अशा परिस्थितीत बॉलिवूड आता आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची चाचपणी करताना दिसत आहे. यातच टायगर श्रॉफच्या 'स्क्रू ढीला' चित्रपटाबाबत मोठी अपडेट येत आहे. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या या चित्रपटाचा टीझर काही वेळापूर्वी प्रदर्शित झाला होता. पण आता बातमी येत आहे की हा चित्रपट वर्षभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये प्रदार्पण करणार होती.

रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) बॉलिवूडचे अनेक चित्रपट साईन केले आहेत. यात सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा 'मिशन मजनू', रणबीर कपूरसोबतचा 'पशु' आणि अमिताभ बच्चनसोबतचा 'गुडबाय' या चित्रपटांचा सामावेश आहे. मात्र या यादीतून 'स्क्रू ढीला'चे नाव सध्यातरी बाहेर झाले आहे. दरम्यान, साऊथमध्ये तिच्या 'पुष्पा द रुल' या चित्रपटावर काम सुरू झाले आहे. मात्र, बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा सध्या तरी पूर्ण होताना दिसत नाही. चित्रपटाला उशीर होण्यामागे तारखेचा मुद्दा असल्याचे सांगण्यात येत असून धर्मा प्रॉडक्शन टायगरच्या इतर कुठल्या चित्रपटावर काम करत असल्याचे बोलले जात आहे.

रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) बॉलीवूड लाइनअप खूपच मजबूत आहे कारण तिच्याकडे तीन चित्रपट आहेत. हेच कारण आहे की सध्या ती बहुतांश वेळा मुंबईत दिसते. रश्मिकाने 2016 मध्ये किरिक पार्टी या चित्रपटाद्वारे कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तिच्या लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अंजनी पुत्र (2017), गीत गोविंदम (2018), यजमान (2018), सरिलेरू नीकेव्वरू (2020), भीष्म (2020), पोग्रू (2021) आणि 'पुष्पा द राइज' (2022) यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news