Rashmika Mandanna Escaped Death : ‘मृत्यूपासून थोडक्यात बचावलो…’ : रश्मिका मंदानाची इन्स्टा स्टोरी चर्चेत

Rashmika Mandanna Escaped Death
Rashmika Mandanna Escaped Death
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य ते बॉलीवूड असा फिल्म इंडस्ट्रीत प्रवास असणाऱ्या अभिनेत्री मंदानाबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. रश्मिका मंदाना प्रवास करत असलेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या घटनेनंतर अभिनेत्री मंदाना हिने सोशल मीडियावर पोस्ट करत तिने 'मृत्यूच्या दारातून परतले' असल्याचे म्‍हटलं आहे. यावेळी तिच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा दासही होती. (Rashmika Mandanna Escaped Death)

 रश्मिका मंदान्ना यांच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी विमानाने पुन्हा उड्डाण केले. इमर्जन्सी लँडिंगदरम्यान अभिनेत्रीला मृत्यू जवळ आल्याचे जाणवले. आपण जगू शकणार नाही असे तिला वाटू लागले होते. त्यामुळे तिने तिच्या मनातील भावना सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Rashmika Mandanna Escaped Death)

Rashmika Mandanna Escaped Death
Rashmika Mandanna Escaped Death

'आम्ही थोडक्यात बचावलो…'- रश्मिका मंदानाची इन्स्टा स्टोरी चर्चेत

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर श्रद्धा दाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हे शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने लिहिले की, 'आम्ही मृत्यूपासून थोडक्यात बचावलो असल्याची माहिती आहे.' असे म्हटले आहे. या फोटोमध्ये रश्मिका तिच्या सीटवर बसलेली दिसत आहे आणि अभिनेत्री श्रद्धा दास देखील तिच्यासोबत दिसत आहे. त्याचवेळी, या फोटोमध्ये तुम्ही खाली पाहिले तर रश्मिकाने तिचा पाय तिच्या समोरील सीटवर जबरदस्तीने दाबला असल्याचे दिसत आहे. (Rashmika Mandanna Escaped Death)

ॲनिमल' नंतर आता 'ॲनिमल पार्क' लवकरच

'ॲनिमल' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. 'ॲनिमल' मधील रश्मिका आणि रणबीर कपूरची पडद्यावरील जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. त्याचवेळी, त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'ॲनिमल पार्क' देखील लवकरच प्रेक्षकांच्‍या भेटीला येणार आहे, असे देखील निर्मात्याने म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news