Ranveer Singh Nude Photoshoot : ‘तो’ फोटो मॉर्फ केल्याचा अभिनेता रणवीर सिंहचा दावा

ranveer singh
ranveer singh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपूर्वी न्यूड फोटोशूट ( Ranveer Singh Nude Photoshoot ) करून चर्चेत आला होता. यानंतर त्याच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठविली गेली. याच दरम्यान चेंबूर पोलिसांत त्याच्या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला  हाेता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या चौकशीत रणवीरने त्याचा जबाब नोंदवत हा फोटो मॉर्फ केला असल्याचा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करून चर्चेत आला होता. यानंतर काही नेटकऱ्याच्या त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली तर काही नेटकऱ्यांनी त्याचे कौतुकदेखील केले. याच दरम्यान रणवीरच्या न्यूड फोटोशूटमुळे चाहत्याच्या भावना दुखावल्या असल्याचा गुन्हा चेंबूर पोलिसात दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरूवात केली. या चौकशीत रणवीरने हा फोटो जसा आहे तसा नसून वेगळ्या पद्धतीने व्हायरल झाल्याचे म्हटलं आहे.

याबाबत रणवीरने सांगितले की, मी एका मासिकासाठी सात फोटोचे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. यातील एक फोटो हा मॉर्फ केलेला होता. तोच फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. हे सात फोटो लगेचच पब्लिश होणार नव्हते. तर एका ठराविक काळानंतर एक- एक फोटो पब्लिश होणार होते. या कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणाचाही भावना दुखावणार नाहीत यांची खबरदारी घेतली असल्याचेही त्‍याने सांगित. परंतु, मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि पोलिसांत गुन्हा दाखल झाली. हा फोटो जसा आधी होता तसा नसल्याचेही त्याने आपल्‍या जबाबत म्‍हटले आहे.

रणवीर सिंह लवकरच 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीरसोबत अभिनेत्री आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन हे स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट १० फ्रेबुवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news