पुढारी ऑनलाईन डेस्क : रणवीर सिंहची (Ranveer Singh) फॅशन किती अजब गजब असते हे सर्वांनाच माहिती आहे. रंगबेरंगी कपडे घालणे रणवीरची फॅशनच नव्हे तर सवय आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अंतरंगी फॅशन करणे रणवीरच्या (Ranveer Singh) सवयीचा भाग आहे. पार्टी असो वा कार्यक्रम रणवीर सिंहचे रंगबेरंगी कपडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. इतकेच काय तर ते इंटरनेट इतके व्हायरल होतात की, रणवीरचे कौतुक तर होतेच. कधी त्याचा हा प्रकार लोकांना अजब गजब वाटू लागतो. आतादेखील रणवीर सिंहने पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये फोटोशूट केलाय,जे पाहून तुम्हीही म्हणाल की, ही नेमकी कोणती फॅशन आहे. (Ranveer Singh)
रणवीरने पिवळ्या रंगाचा प्रिंटेड शर्ट आणि पँट घातली आहे. या शर्टमध्ये हे पिस्ता रंग आणि दुसारा गुलाबी रंग आहे. शर्टाला गुलाबी रंगाची बॉर्डर आहे. पँटदेखील याच पॅटर्नची आहे. काही निवडक फोटोंमध्ये तो पोज देताना दिसतोय. काही फोटोंमध्ये तो कारजवळ उभा आहे. दुसऱ्या फोटोंमध्ये तो कारच्या बोनेटवर बसलेला दिसतो. या पेहराव्यावर त्याने पांढऱ्या रंगाची जाड बॉर्डर असेला काळा गॉगल डोळ्यांवर घातलेला दिसतो. त्याच्या गळ्यात एक लॉकेट देखील दिसते.
हे फोटो शेअर करत असताना त्याने Baroque Bliss ? @versace अशी कॅप्शन लिहिलीय. हे फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडलेले आहेत. चाहत्यांनी रणवीरला कमेंट् बॉक्समध्ये काय काय म्हटलंय पाहा-Monday Motivation ???,
???, ???❤️❤️❤️, Baba on fia ?, Rolls Royce pe joote…. Jesus … bhagwan dekh raha hai …, Come on Versace Versace ??, Vibeeee haiii ??, Aladin ?❤️?, Boom, ricky bahl baby and he is smuth as silk before you blink this cat drinks the milk you never seen him coming keep switching his moves, keep changing his color conman baby he is a lover, cons karne ki hai khujli chakma deke he is out of there quickly??????, King of color combos ? Nobody does this color combo better!!!!, Guly boy❤️, Wo!! Very Dashing??, Arre bhaiya ye aese kapde kaha milte ho ?, Khali Bali ho gaya he dil, ❤️❤️❤️??????????lots of love baba.
विशेष म्हणजे रणवीरला अनेकांनी 'बाबा' असे म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात त्याला 'बाबा' म्हणून बोलावलं तर नवल वाटायला नको!