Alia Bhatt- Ranbir Kapoor
Alia Bhatt- Ranbir Kapoor

रणबीर-आलियाच्या ‘बेबी’चं झालं बारसं! मूल जन्माला यायच्या आधीच उरकला नामकरण सोहळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranbir Kapoor Alia Bhatt Baby Name : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत आहे. खुद्द आलियानेच आपण लवकरच आई होणार असल्याचे इंस्टाग्रामवरून जाहीर केले होते. ही आनंदी वार्ता वाचल्यानंतर अनेकांनी आलियाची पोस्ट शेअर करत त्यावर कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला. या स्टार कपलच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे ऐकल्यापासून चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रणबीर सध्या त्याच्या आगामी 'शमशेरा' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. अशा स्थितीत तो जवळपास दररोज मीडियाला सामोरे जात आहे.

मीडियाशी संवाद साधताना रणबीर कपूर अनेकदा त्याच्या भावी अपत्याबद्दल बोलतो. काही दिवसांपूर्वी त्याने आलिया जुळ्या मुलांना जन्म देऊ शकते, असे म्हटले होते. तसेच आपल्या होणा-या अपत्याला केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर स्थित मसाई मारा अभयारण्यात घेऊन जाणार असल्याचे रणबीरने सांगितले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने तो त्याच्या अपत्याचे नाव काय ठेवणार आहे? याचा खुलासा केला आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Baby Name)

फिल्मबीटला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा रणबीर कपूरला विचारण्यात आले की, कपूर कुटुंबातील जवळपास सर्व पुरुषांच्या नावाची सुरुवात 'र' अक्षराने होते, तुम्ही तुमच्या मुलाचे नाव 'र' वरून ठेवणार की दुसरे कुठले नाव ठेवणार आहात? यावर रणबीर म्हणाला की, 'मी माझ्या अपत्यासाठी 'र' आणि त्या अक्षराशिवाय अनेक नावांचा विचार केला आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा अपत्याला तुमच्या कुशीत घेता आणि अचानक तुमच्या मनात ते नाव येते, तो क्षण सर्वात खास असतो.' (Ranbir Kapoor Alia Bhatt Baby Name)

रणबीर चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच त्याचा 'शमशेरा' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news