Neetu Chandra : पत्नी होण्यासाठी महिना २५ लाखांचा पगार, उद्योजकाने ‘या’ अभिनेत्रीला दिली ऑफर

Neetu Chandra : पत्नी होण्यासाठी महिना २५ लाखांचा पगार, उद्योजकाने ‘या’ अभिनेत्रीला दिली ऑफर

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिल्म इंडस्ट्रीबद्दल असं म्हटलं जातं की हे खूप अस्थिर क्षेत्र आहे. तुम्ही आज स्टार असाल तर उद्या बेरोजगार. यापूर्वीही या समस्येशी झगडणारे अनेक कलाकार चर्चेत आले आहेत. आता 'गरम मसाला' आणि 'ओय लकी! लकी ओये! सारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री नीतू चंद्रा (Neetu Chandra) हिला या समस्येचा सामना करावा लागत आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत नीतूने सांगितले की, तिच्या करिअरमध्ये एक असा टप्पा आला होता जेव्हा एका उद्योजकाने तिला धक्कादायक ऑफर देण्यात आली होती. पगारदार पत्नी होण्यासाठी त्या उद्योजकाने अभिनेत्रीला चक्क दरमहा २५ लाख रुपये पगारावर देईन असे म्हटले होते.

तो उद्योगपती नीतूला (Neetu Chandra) पत्नी होण्यासाठी पैसे द्यायला तयार झाला होता. नीतू पुढे म्हणाली की, तिला चित्रपटसृष्टीत खूप अनावश्यक वाटतं. तिने 13 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांसोबत काम केले. पण आजही तिच्याकडे काम नाही. तिने ऑडिशनशी संबंधित एक अनुभवही मुलाखतीदरम्यान सांगितला. ती म्हणाली, 'एक कास्टिंग डायरेक्टर आहे, ज्याचे खूप मोठे नाव आहे. मला नावं ठेवायची नाहीत. ऑडिशनच्या वेळी म्हणजे तासाभरातच तो म्हणाला की मला माफ कर नीतू. हे काम करत नाही. तुम्ही माझी ऑडिशन घेतली कारण माझा आत्मविश्वास डळमळीत व्हावा.'

बॉलिवूड हंगामाने या मुलाखतीचा टीझर रिलीज केला आहे. येथे नीतूला (Neetu Chandra) विचारले गेले की तिला परफॉर्मन्स-स्कोप असलेल्या भूमिका करायला आवडेल का. यामुळे लोकांना ती खंबीर आणि स्वत:च्या मताची स्त्री असल्याचे वाटले. या कारणांमुळे अनेक कलाकारांना कामाच्या अभावाला सामोरे जावे लागत आहे. यावर नीतूने उत्तर देते की, तुम्हीच सांगा मी काय करू? मी माझा गळा कापू का? लोक निघून गेल्यावरच (मृत्यू झाल्यावरच) त्यांच्या कामाला ओळख मिळते का? असंच झाले पाहिजे का? जसं की सुशांतने पाऊल उचलले, किती जण असा विचार करतात.

सेलिब्रिटींच्या मुलाखतींवर लोक अनेकदा प्रश्न उपस्थित करतात. सेलिब्रिटींना फक्त त्यांचा प्रवास सांगण्याच्या बहाण्याने स्वतःचा प्रचार करायचा आहे. अशा मुलाखतींनंतर असे धक्कादायक विधान करणे म्हणजे निव्वल 'पब्लिसिटी स्टंट' अशी चर्चा होते. नीतूही या मुद्द्यावर बोलली. ती म्हणाली, 'जे लोक ऐकत आहेत, मला खात्री आहे की नीतू सहानुभूती घेण्यासाठी आली आहे. नीतू पीआर करत आहे. हे सगळं सांगायला मी आधी कधी आले नाही'

नीतूचा 2021 मध्ये रिलीज झालेला शेवटचा चित्रपट 'नेव्हर बॅक डाउन: रिव्हॉल्ट' होता. जो कोणत्याही अर्थाने संस्मरणीय चित्रपट नव्हता. काही लघुपटांमध्ये काम केल्यानंतर, नीतूने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम स्टारर 'गरम मसाला' या चित्रपटातून पदार्पण केले. नंतर तिने 'नो प्रॉब्लेम', 'वन टू थ्री' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आणि 'ट्रॅफिक सिग्नल', 'ओये लकी! लकी ओये सारख्या चित्रपटात ती दिसली. तिने हिंदीशिवाय भोजपुरी आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2019 मध्ये एक 'मैथिली' चित्रपट आला होता. 'मिथिला माखन' या नावाने. ज्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. नीतू स्वत: या चित्रपटाची निर्माती होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news