Ramiz Raja : ‘पीएसएलला लिलाव मॉडेलमध्ये आणले तर आयपीएल कोण खेळणार नाही’

Ramiz Raja : ‘पीएसएलला लिलाव मॉडेलमध्ये आणले तर आयपीएल कोण खेळणार नाही’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (pakistan cricket board) अध्यक्ष रमीझ राजा (ramiz raja) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जर पाकिस्तान सुपर लीग (pakistan super league) लिलाव मॉडेलमध्ये गेला तर कोणीही आयपीएलमध्ये (Indian Premier League) खेळणार नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना ते म्हणाले 'आता पीएसएलला (PSL) लिलावाच्या मॉडेलमध्ये जाण्याची गरज आहे. मला पुढील वर्षापासून लिलाव मॉडेलवर स्विच करायचे आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही या विषयावर फ्रेंचायझी मालकांशी बोलू.'

रमीझ राजा पुढे म्हणाले, 'हा सगळा पैशाचा खेळ आहे. जेव्हा पाकिस्तानमध्ये क्रिकेटची अर्थव्यवस्था वाढेल, तेव्हा पाकिस्तानचा सन्मानही वाढेल. पीएसएल हे पीसीबीच्या आर्थिक अर्थव्यवस्थेचे प्रमुख साधन आहे. ही स्पर्धा लिलावाच्या मॉडेलमध्ये घेतली तर फ्रँचायझींची कमाई वाढेल आणि मग पाहूया की कोणता खेळाडू पीएसएलऐवजी आयपीएलमध्ये खेळतो.

बाकी लीग ठरल्या अपयशी (ramiz raja) 

आयपीएलचे यश पाहून रमीझ राजाने असा दावाही केला आहे की, भविष्यात पीएसएल इतके मोठे होईल की जग आयपीएलला विसरेल. आयपीएलच्या धर्तीवर इतर देशांनीही टी 20 लीग सुरू केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग (big bash league) (BBL), वेस्ट इंडिजची कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) (CPL)आणि बांगलादेशची बांगलादेश प्रीमियर लीग (bangladesh premier league) (BPL) यांचा समावेश आहे, पण, जे यश इंडियन प्रीमियर लीगला मिळाले ते इतर कोणत्याही लीगला मिळवता आले नाही.

रमीझचा दावा – आयपीएलला हरवू (ramiz raja) 

सध्या पाकिस्तान बोर्डाच्या कमाईसाठी पीएसएल, प्रायोजकत्व आणि आयसीसीवर (ICC) अवलंबून आहे. पाकिस्तान बोर्डाला आता अधिक कमाईच्या दृष्टीने पुढील हंगामासाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेचे आयोजन करायचे आहे. आतापर्यंत पीएसएलमधील खेळाडूंचा समावेश ड्राफ्टद्वारे केला जात होता. रमीझ राजा लिलावासाठी जोर लावत आहेत. सध्या बाजार यासाठी योग्य आहे, असे त्यांचे मत आहे. जर आम्ही पीएसएलला लिलावाच्या मॉडेलमध्ये आणले आणि पैसे वाढवले, तर मी पीसीएलला आयपीएलच्या बरोबर नेऊन ठेवेन आणि नंतर पाहू पीएसएल सोडून कोण आयपीएल खेळणार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news