Ram Charan-Dhoni : ‘एकाच फ्रेम’मध्ये दोन वाघ; राम चरण-धोनीची ‘मिलेनियर डॉलर’ भेट

dhoni-ram charan
dhoni-ram charan

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार राम चरण सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर राम चरणने (Ram Charan-Dhoni) भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीची भेट घेतली. यावेळी दोघांनी पोझदेखील दिली. आरआरआर फेम राम चरण आणि एम एस धोनी यांचा हा खूप सुंदर फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतोय. धोनी या फोटोत स्मित हास्य करताना दिसतोय. महेंद्र सिंह धोनी कॅज्युअल ब्लू टी-शर्टमध्ये दिसला. (Ram Charan-Dhoni)

या भेटीत राम चरणने आलिव्ह ग्रीन कलरचा कॅज्युअल शर्ट घातला आहे. सोबत ग्रे कलर ट्राऊझर घातली आहे. तेलुगु स्टार राम चरणने कॅप्शन लिहिलीय-'Soo Happy to meet India's pride @mahi7781.'

फोटो पाहून दोघांचेही चाहते कसे गप्प बसतील? दोन्ही दिग्गजाच्या चाहत्यांनी कॉमेंट्स करायला सुरुवात केली. या पोस्टला जवळपास ५ लाख लाईक्स आणि ४ हजार ७०० हून अधिक कॉमेंट्स मिळाले होते. युजर्स पोस्टवर सातत्याने कॉमेंट्स करत आहेत.

चाहत्यांनी लव्ह आणि फायर इमोजी पोस्ट केले. एकाने मजेशीर कॉमेंट केलय-टू गोट्स ऑफ इंडिया. दुसऱ्याने कॉमेंट्स केलीय-एका फ्रेममध्ये दोन वाघ.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

एका अन्य युजर्सने लिहिलंय, मी नजर नाही हटवू शकत. तेलुगु स्टार राम चरण मुंबईत पोहोचलाा आणि आपली अयप्पा दीक्षा पूर्ण केल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात गेले होते. जेव्हा ते प्रार्थना करत होते, तेव्हा पापराझींनी त्याचा फोटो क्लिक केला.

एस शंकर यांच्या गेम चेंजरमध्ये राम चरण कियारासोबत दिसणार आहे. आरसी १६ चे दिग्दर्शन उपेन्नाच्या बुच्ची बाबू सनाने केले आहे. संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news