मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन गेमिंग अॅपप्रकरणी बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याला सक्तवसुली संचालनालय म्हणजेच 'ईडी'ने समन्स बजावले असून, त्याला 6 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
ऑनलाईन गेमिंग अॅप महादेव बूकची जाहिरात रणबीर करत होता व त्यासाठी त्याला घसघशीत रक्कम मिळाल्याचा दावा 'ईडी'ने केला आहे. आता तो स्वतः 'ईडी'समोर हजर राहणार की, वकिलामार्फत समन्सला उत्तर देणार, हे स्पष्ट व्हायचे आहे. याप्रकरणी अन्य
17 सेलिब्रिटींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दुबईतून ऑनलाईन बेटिंग अॅप चालवणारा सौरभ चंद्राकर आणि त्याचा व्यावसायिक भागीदार रवी उप्पल यांची चौकशी सध्या 'ईडी'कडून सुरू आहे.