Rakhi Sawant Emotional Post: आईच्या निधनानंतर राखीची भावूक पोस्ट (पाहा व्हिडिओ)

Rakhi Sawant Emotional Post:
Rakhi Sawant Emotional Post:

पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री राखी सावंतच्या  आई जया सावंत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखी सावंत यांच्या आई जया या ब्रेन ट्यूमरच्या आजाराने ग्रस्त होत्या. या दु:खद प्रसंगानंतर आई जया हिच्याविषयी राखी हिने 'तुझ्याविना माझे काहीच नाही राहिले' अशी भावूक (Rakhi Sawant Emotional Post) पोस्ट सोशल मीडियावरून केली आहे.

राखीने फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज माझ्या आईचा हात डोक्यावरून गेला. माझ्याकडे आता गमवण्यासारेखे काहीच राहिले नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आई. तुझ्याविना काहीच नाही राहिले. आता माझा आवाज कोण ऐकणार?, मला कोण मिठीत घेणार? आता मी काय करू? कुठे जाऊ?, असे म्हणत I miss you Aai❤️ असे म्हणत आईविषयीचे प्रेम (Rakhi Sawant Emotional Post) व्यक्त केले आहे.

राखीच्या भावाचा माध्यमांशी संवाद

राखी सावंत (Rakhi Sawant Emotional Post) हिच्या आईच्या मृत्यूबद्दल माध्यमांशी बोलताना, राखीच्या भावाने खुलासा केला की, गेल्या एक तासापासून तिचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. मम्मी आता नाही राहिली. मम्मी आझाद झाली. या जगातून आणि वेदनेपासून तिची सुटका झाली. ती तीन वर्षांपासून कॅन्सरसारख्या आजाराशी लढत आहे. आता फक्त मम्मीला शांती मिळो; असे त्याने यावेळी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news