Raju Shetti Tweet : राजू शेट्टी यांचं सूचक ट्विट; म्हणाले, “शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा…”

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यविधीमंडळाचे शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. अधिवेशना दरम्यान विरोधी पक्ष राज्यातील कांदा, कापूस, सोयाबीन, हरबरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्या समस्या, शेत मालाला मिळणारा कवडीमोल दर, कांदा उत्पादक आदी समस्यांवर विरोधी पक्षाने सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी (Farmers) संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ट्वीट करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. (Raju Shetti Tweet)

Raju Shetti Tweet : शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारे

स्वाभिमानी शेतकरी (Farmers) संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ट्वीट करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. त्यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतक-यांच्या पाठीत" अशा आशयाचं ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,

"गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहून समाधान वाटले. पण हेच विरोधी पक्ष जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा भूमिअधिग्रहण, दोन टप्यातील एफ. आर. पी यासारखे शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारे निर्णय घेताना यांच्यातील शेतकरी प्रेम विधीमंडळाच्या कोणत्या खुंटीला टांगले होते. तेंव्हा आताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर सभागृहात गोंधळ घालतात व सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर मुग गिळून गप्प का आहेत? शेतकऱ्यांनो राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात व सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात !!"

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news