Rajinikanth : जुनी परंपरा पुन्हा सुरु करणार रजनीकांत, हिमालयाकडे जाणार

Rajinikanth
Rajinikanth

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार रजनीकांत 'जेलर' चित्रपटाच्या रिलीज नंतर हिमालयाकडे जाणार आहेत. त्यांची ही जुनी अनेक वर्षांची परंपरा आहे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मनाच्या शांतीसाठी ते धार्मिक यात्रा सुरू करतात. यावेळीही ते ६ किंवा ७ ऑगस्ट रोजी रवाना होणार आहेत. (Rajinikanth) साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आगामी चित्रपट 'जेलर' मुळे चर्चेत आहे. आता असे वृत्त समोर येत आहे की, संपूर्ण चित्रपट झाल्यानंतर शांतीसाठी ते हिमालयाच्या अध्यात्मिक प्रवासावर जाण्याची परंपरा सुरू करतील. रिपोर्ट्सनुसार, 'जेलर'शी संबंधित सर्व कामे संपल्यानंतर ते रवाना होणार आहेत. २०१० मध्ये त्यांना आरोग्याशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागला होता. आरोग्याशी दोन हात केल्यानंतर त्यांनी ही परंपरा थांबवली होती. (Rajinikanth)

२०१८ मध्ये 'काला' आणि '२.०' चित्रपट पूर्ण झाल्यानंतर सुपरस्टारने हिमालयाचे अध्यात्मिक मार्गक्रमण सुरू केले. परंतु, कोरोना व्हायरसमुळे दोन वर्षे ब्रेक मिळाला. आता 'जेलर'ची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रजनीकांत पुन्हा एकदा हिमालयाच्या शांतीत राहण्यासाठी तयार आहेत. हा चित्रपट ॲक्शनने भरपूर आहे. हा तमिळ चित्रपट नेल्सन द्वारा लिखित, दिग्दर्शित आहे. सन पिक्चर्स बॅनर अंतर्गत कलानिधि मारन यांची निर्मिती आहे.

चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, मिरना मेनन, योगी बाबू आणि विनायकन यासारखे स्टार्स आहेत. अभिनेता मोहनलाल एक स्पेशल गेस्टच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. याची अधिकृत घोषणा फेब्रुवारी २०२२ मध्ये झाली होती. हा रजनीकांत यांचा १६९ वा चित्रपट आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news