कडूस गोहत्येचे सर्वत्र पडसाद; राजगुरूनगरला कडकडीत बंद पाळून शहरातुन मोर्चा

कडूस गोहत्येचे सर्वत्र पडसाद; राजगुरूनगरला कडकडीत बंद पाळून शहरातुन मोर्चा
Published on
Updated on

राजगुरूनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कडुस,(ता खेड) येथे एकादशीच्या दिवशी गोहत्या झाल्याच्या निषधार्थ सोमवारी( दि. ३ जुलै) राजगुरूनगर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवण्यात आले. लहानमोठ्या सर्वच व्यापाऱ्यांनी सकाळपासून उत्स्फर्तपणे दुकाने बंद ठेवली होती. सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राजगुरूनगर मध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजगुरूनगर येथील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली.

अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यासह २० अधिकारी आणि १०० पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. चाकण मध्ये देखील बंद पाळुन निषेध मोर्चा काढण्यात आला. याशिवाय कडुस घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील गावोगावी बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news