राजस्‍थानमधील भाजप सरकारला मोठा झटका, पोटनिवडणुकीत मंत्री सुरेंद्रपाल पराभूत!

राजस्‍थानचे मंत्री सुरेंद्रपाल सिंह टीटी. दुसर्‍या छायाचित्रात पाेटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह कुन्नर.
राजस्‍थानचे मंत्री सुरेंद्रपाल सिंह टीटी. दुसर्‍या छायाचित्रात पाेटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह कुन्नर.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमधील करणपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसच्या रुपिंदर सिंह कुन्नर यांनी मंत्री सुरेंद्रपाल सिंग टीटी यांचा पराभव केला आहे. या जागेवर काँग्रेसने 12570 मतांनी विजय मिळवला आहे.
( Karanpur Assembly By Election Results )

सुरेंद्रपाल ठरणार भजनलाल सरकारमधील राजीनामा देणारे पहिले मंत्री

शपथ घेतल्यानंतरच राजीनामा देणारे सुरेंद्रपाल सिंग टीटी हे पहिले मंत्री होऊ शकतात. तसेच मंत्रीपदाची शपथ घेवून पोटनिवडणुकीत पराभव होण्‍याची राजकारणातील ही दुर्मिळ घटना ठरली आहे. ( Karanpur Assembly By Election Results )

पोटनिवडणुकीचा निकाल येण्‍यापूर्वीच भाजपने सुरेंद्रपाल सिंग टीटी यांची भजनलाल सरकारमध्‍ये मंत्रीपदी वर्णी लागली होती. त्‍यामुळे करणपूर विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राजस्‍थानचे लक्ष वेधले होते. आज (दि.७)  या मतदारसंघातील मतमोजणी १८ फेऱ्यांमध्ये होती. काँग्रेसच्या रुपिंदर सिंह कुन्नर यांनी 12570 मतांच्‍या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.

पोटनिवडणुकीसाठी ५ जानेवारी रोजी झाले होते मतदान

करणपूर विधानसभेच्या जागेवर २५ नोव्हेंबरला मतदान झाले नव्हते. 75 वर्षीय काँग्रेस नेते गुरमीत सिंग किन्नर या जागेवरून निवडणूक लढवणार होते, मात्र 15 नोव्हेंबरला त्यांचे निधन झाले. त्‍यामुळे निवडणूक आयोगाने ५ जानेवारी रोजी येथे मतदान होईल, असे स्‍पष्‍ट केले होते. काँग्रेसने रुपिंदर सिंग कुनर यांना उमेदवारी दिली.

राजस्‍थान काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी मुख्‍यमंत्री अशाेक गेहलाेत यांनी रुपिंदर सिंह कुन्नर यांचे अभिनंदन केले आहे. त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "श्रीकरणपूरमधील विजयाबद्दल काँग्रेसचे उमेदवार श्री रुपिंदर सिंग कुन्नर यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. हा विजय स्व. गुरमीत सिंग हे कुन्नरच्या जनसेवेच्या कामांना समर्पित आहेत.श्रीकरणपूरच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या अभिमानाचा पराभव केला आहे."

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news