राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांना कोरोनाची लागण

राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री भजनलाल शर्मा. ( संग्रहित छायाचित्र)
राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री भजनलाल शर्मा. ( संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्‍यांनी X वर पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे. ( Rajasthan CM Bhajanlal Sharma tests positive for covid 19)

भजनलाल यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वतःला आयसोलेशन केले आहे. कार्यक्रमांमध्ये व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग घेतला जाणार असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

राजस्‍थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका पोस्टद्वारे भजनलाल यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्‍या पोस्टमध्ये लिहिले आहे की की, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. त्याला लवकरात लवकर बरे व्हावे, अशी माझी इच्छा आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news