राजाराम साखर कारखाना निवडणूक : वंदूर मतदान केंद्रावर दोन्ही गटांना मतदारांची प्रतीक्षा

राजाराम साखर कारखाना निवडणूक
राजाराम साखर कारखाना निवडणूक

कागल; पुढारी वृत्तसेवा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी वंदूर येथील मतदान केंद्र सज्‍ज आहे. बाहेरगावी सहलीसाठी गेलेल्या मतदारांच्या प्रतीक्षेत येथील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत. नऊ वाजेपर्यंत 15 मतदारांनी मतदान केले आहे. बाहेरगावी फिरण्यासाठी गेलेले मतदार दुपारनंतर येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते सहलीसाठी गेलेल्या मतदारांची वाट पाहत थांबल्‍याचे चित्र दिसत आहे.

या मतदान केंद्रावर एकूण 105 मतदार आहेत. यातील मयत सभासदांची संख्या देखील मोठी आहे. वंदूर येथील 89 करनूर पाच आणि लिंगनूर दुमालात पाच असे मतदार आहेत. एकूण मतदार संख्या 89 इतकी आहे. कार्यकर्ते मतदारांची काळजी घेत आहेत.

मतदारही मोठ्या उत्साहात मतदानासाठी येत आहेत. देवदर्शन आणि गोव्याचे दर्शन घेऊन आल्यानंतर काही मतदारांकडून मतदान केले जाणार आहे. दोन्ही गटाकडून मतदारांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news