राजाराम कारखाना निवडणूक : विरोधी आघाडीचे उमेदवार सचिन पाटलांना मतदान केंद्रावर पोलिसांनी रोखले; समर्थकांची हुज्जत | पुढारी

राजाराम कारखाना निवडणूक : विरोधी आघाडीचे उमेदवार सचिन पाटलांना मतदान केंद्रावर पोलिसांनी रोखले; समर्थकांची हुज्जत

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : राजाराम कारखान्याच्या संस्था गटातील विरोधी परिवर्तन आघाडीचे उमेदवार सचिन पाटील यांना सेंट झेवियर्स हायस्कूल मतदान केंद्रात पोलिसांनी प्रवेशद्वारातून आत सोडले नसल्याने विरोधी परिवर्तन आघाडीच्या समर्थकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व 58 मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान सुरू आहे. सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या आहेत. करवीर (कोल्हापूर शहर) आणि संस्था गटातील मतदान सेंट झेवियर हायस्कूल येथे सुरू आहे. या मतदान केंद्रावर राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे उमेदवार सचिन पाटील गेले असता पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

Back to top button