Hemant Soren : माझ्या अटकेत राजभवनाचा हात : हेमंत सोरेन यांचा विधानसभेत आरोप

Hemant Soren : माझ्या अटकेत राजभवनाचा हात : हेमंत सोरेन यांचा विधानसभेत आरोप
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंड विधानसभेत चंपाई सोरेन यांच्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन विधानसभेच्या विशेष सत्राला आज (दि.५) उपस्थित राहिले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कडक बंदोबस्तात सोरेन विधानसभेत दाखल झाले. Hemant Soren

झारखंड विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेला संबोधित करताना म्हटले की, 31 जानेवारी ही काळरात्र होती. यामुळे देशाच्या लोकशाहीसाठी हा काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. देशात प्रथमच एका मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. या अटकेत राजभवनचाही सहभाग होता. ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे. त्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटत आहे. आज मी या सभागृहात चंपाई सोरेन यांच्या विश्वासदर्शक ठरावात भाग घेत आहे. आमचा संपूर्ण पक्ष आणि आघाडी चंपाई सोरेन यांना पाठिंबा देत आहे."Hemant Soren

Hemant Soren : झारखंड विधानसभेचे संख्याबळ

झारखंड विधानसभेत एकूण 81 सदस्य आहेत. यातील एक जागा सध्या रिक्त आहे. एका आमदाराने आजारपणामुळे फ्लोअर टेस्टला हजेरी लावली नाही. विधानसभेत 79 आमदार असून बहुमताचा आकडा 40 झाला आहे. सत्ताधारी आघाडीत एकूण 48 आमदार आहेत. ज्यात JMM चे 29, काँग्रेसचे 17, RJD चा एक, CPI (ML) चा एक आमदार आहे. भाजपचे 26, AJSU चे 3, NCP (AP) चे एक आणि दोन अपक्ष आमदार आहेत. तर विरोधी आमदारांचा एकूण आकडा 32 आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news