पोलादपूर : धनराज गोपाळ मुंबई-गोवा महामार्गावरील महामार्ग पोलीस केंद्र कशेडीच्या हद्दीमध्ये चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. हा अपघात (शुक्रवार) रात्री ९.१० वाजता घडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कशेडी टॅप पासून दोन किलोमीटर अंतरावर बारामती-पुणे ते दापोली जाणारी हुंदाई i20 कार क्रमांक MH-42-BE-4449 वरील चालक कैलास मनोहर वनवे (वय 49) राहणार बारामती पुणे यांचे ताब्यातील गाडीला मागून जाणाऱ्या टँकर क्रमांक DD-01-J-9660 या गाडीने मागून ठोकर दिली. या धडकेमुळे सदर गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या नाल्यामध्ये गेली. तसेच बारामती पुणे ते दापोली जाणारी क्रेटा कार गाडी क्रमांक MH-12-RY-8888 वरील चालक सुयोग जयवंत कुलकर्णी (वय 31 वर्षे) राहणार बारामती पुणे यांनी टँकरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा अशोक लेलँड ट्रक क्रमांक AP-02-TE-4858 या गाडीला समोरासमोर ठोकर दिली. अपघातामधील दोन्ही कार गाड्यांच्या एअर बॅग ओपन झाल्या. तसेच अपघातामध्ये हुंदाई i20 गाडी मधील मागे बसलेला प्रवासी दत्तात्रय शरद टेके (वय 42 वर्षे) राहणार माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे यांना मुकामार लागून अंतर्गत दुखापती झाल्याने त्यांना तात्काळ नरेंद्र महाराज ॲम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. सदर अपघातामध्ये अन्य कोणालाही कोणत्याही प्रकारे दुखापत झाली नाही. अपघातामधील चारही वाहनांचे नुकसान झालेले आहे.
या अपघाताची माहिती समजताच पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर, पीएसआय उदय धुमास्कर, पोलीस हवालदार कदम, पो. हे. बामणे पोना घुले, बनसोडे, किर्वे आदींनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
हेही वाचा :