आज नाही तर उद्या सत्याचा विजय हाेताेच : राहूल गांधी

आज नाही तर उद्या सत्याचा विजय हाेताेच : राहूल गांधी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्‍हणाले, आज नाही तर उद्या सत्याचा विजय हाेताेच असताे. मला माझे ध्येय माहित आहे, मला माहित आहे की मला काय करायचे आहे. ज्यांनी आम्हाला मदत केली आणि जनतेने दाखवलेले प्रेम आणि पाठिंबा त्या सर्वांचे आभारी आहे असे राहूल गांधी म्‍हणाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी दिल्ली येथील काँग्रेसच्या कार्यालयात उपस्‍थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा तिरस्काराच्या विरोधात प्रेमाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. तसेच हा आमचा विजय नसून लोकशाहीचा विजय असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी सांगितले.

मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गांधी यांना गुजरातच्या कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती व गुजरात उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. यावर गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अट्टल गुन्हेगार नाहीत तसेच त्यांच्यावर हत्या, बलात्काराचे आरोप नाहीत, असा युक्तिवाद गांधी यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. याचिकाकर्ते पूर्णेश मोदी यांचे मूळ आडनाव मोदी नाही. नंतर त्यांनी आपले आडनाव मोदी केले होते. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात ज्या लोकांची नावे घेतली होती, त्यातील एकाही व्यक्तीने त्यांच्याविरोधात अवमाननेचा खटला दाखल केला नव्हता. मोदी आडनावाचा समाजघटक छोट्या प्रमाणात असून त्यांच्यात कोणतीही एकरुपता अथवा समानता नाही. ज्या लोकांनी गांधी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे, ते लोक भाजपचे असल्याचेही सिंघवी यांनी युक्तिवादात सांगितले.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news