Rahul Gandhi : राहुल गांधी आजपासून मणिपूर दौर्‍यावर, हिंसाचारग्रस्‍त भागात देणार भेट

Rahul Gandhi : राहुल गांधी आजपासून  मणिपूर दौर्‍यावर, हिंसाचारग्रस्‍त भागात देणार भेट

पुढारी ऑनलाईन : गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचारामुळे मणिपूर धुमसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज (दि.२९जून) आणि उद्या (दि.२९ जून) मणिपूर दौऱ्यावर (Rahul Gandhi) जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानातून आज (दि.२९ जून) मणिपूरला रवाना झाले आहेत. गुरूवार (२९ जून), शुक्रवार (दि.३० जून) रोजी ते मणिपूरमधील काही जिल्‍ह्यांना भेट देणार आहेत. ते येथील मदत शिबिरांना भेट देतील. तसेच इम्फाळ आणि चुराचंदपूरमधील नागरी समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद देखील साधणार (Rahul Gandhi) असल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

मणिपूरमध्ये 3 मे रोजी अनुसूचित जमातीच्या (एसटी) यादीत मैतेई समुदायाच्‍या समावेश करण्याच्या मागणीच्या निषेधार्थ ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने (एटीएसयू) रॅली आयोजित केली होती. रॅलीदरम्यान काही गटात हाणामारी होऊन हिंसाचार झाला. तेव्‍हापासून या मुद्‍यावर मणिपूरमधील हिंसाचाराचे सत्र सुरुच राहिले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news