Delhi Excise Policy Case : ईडीच्या आरोपपत्रात राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचं नाव

खासदार राघव चड्ढा
खासदार राघव चड्ढा
Published on
Updated on

नन दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्लीतील तथाकथित एक्साईज घोटाळा प्रकरणी ईडीच्या दुसऱ्या आरोपपत्रात आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांचं नाव आलं आहे. परंतु, आरोपपत्रात म्हटले गेले आहे, चार्जशीट देवाणघेवाणमध्ये कट रचण्यात आला होता. (Delhi Excise Policy Case) ईडीच्या दुसरी पुरक आरोपपत्रात म्हटलं गेलं आहे की, मनीष सिसोदियाचे माजी सचिव सी अरविंद यांनी तपास यंत्राणांना सांगितलं की, मनीष सिसोदिया यांच्या घरावर झालेल्या बैठकीत राघव चड्ढा उपस्थित होते. अरविंद यांच्या वक्तवयानंतर बैठकीत पंजाबचे आबकारी आयुक्त वरुण रूजम, या प्रकरणातील आरोपी विजय नायर आणि पंजाब आबकारी संचालनालयचे इतर अधिकारीदेखील सहभागी होते. (Delhi Excise Policy Case )

या बैठकीत के कविता यांचे पती डी. आर. अनिल कुमारदेखील उपस्थित होते. त्यांचं नाव या आरोपपत्रात समोर आले आहे. ईडी ने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, के कविता, सरथ चंद्र रेड्डी, अरुण पिल्लाई आणि समीर महेंद्रू एकत्र दिल्लीत मद्य व्यवसायावरील चर्चेसंदर्भात एक बैठक झाली होती.

विजय नायर यांनी समीर महेंद्रु आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये फेसटाईम मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. विजय नायर यांच्याविषयी म्हटले गेले होते की, तो सर्वात आधी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या संपर्कात आला आणि मग हळूहळू त्यांची भेट मनीष सिसोदिया यांच्याशी झाली. त्यानंतर तो आम आदमी पार्टीमध्ये आला.

दरम्यान, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया एक्साईज घोटाळ्यातील भ्रष्टाचारप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news