SIIMA Awards : रॉकेट्री: द नंबी इफेक्टसाठी आर माधवनला 2 पुरस्कार

r madhvan
r madhvan

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर माधवनच्या "रॉकेटरी: द नंबी इफेक्ट"ने SIIMA 2023 सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता – समीक्षक पुरस्कार पटकावला. SIIMA 2023 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते आर. माधवनचा अनोखा सन्मान करण्यात आला.

साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही ॲवॉर्ड्स (SIIMA) २०२३ च्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात प्रतिभावान अभिनेता आर माधवनने एकदा नव्हे तर दोनदा आपली क्षमता सिद्ध केली आणि अष्टपैलू अभिनय आणि अभिनेता म्हणून आपली चमक दाखवली. माधवनचे दिग्दर्शनातील पदार्पण असलेल्या "रॉकेटरी – द नंबी इफेक्ट," हा एका अनोख्या उंचीवर गेला आहे. कारण देखील तितकच खास आहे. कथाकथन आणि दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक (तमिळ) हा सन्मान त्याने मिळवला.

माधवनचे अभिनय कौशल्य SIIMA 2023 मध्ये देखील ओळखले गेले आणि "रॉकेटरी: द नंबी इफेक्ट"मधील भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या भूमिकेमुळे त्याला प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता – समीक्षक (तमिळ) पुरस्कार मिळाला. माधवनने अलीकडेच त्याच्या "रॉकेटरी: द नंबी इफेक्ट"साठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार त्याने मिळवला. आर माधवन लवकरच शशिकांतच्या आगामी क्रिकेट ड्रामा चित्रपट "टेस्ट"मध्ये दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news