Kohinoor Diamond : राज्याभिषेकात राणी कॅमिलांच्या मुकुटात नसेल कोहिनूर हिरा

Kohinoor Diamond : राज्याभिषेकात राणी कॅमिलांच्या मुकुटात नसेल कोहिनूर हिरा

लंडन; वृत्तसंस्था :  किंग चार्ल्स आणि क्विन कॅमिला यांच्या राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू झाली आहे. 6 मे रोजी हा भव्य सोहळा होईल. राजा-राणी बकिंगहॅम पॅलेसमधून ब्लॅक डायमंड ज्युबिली स्टेट कोच या स्वर्णवलयांकित (सोन्याचा मुलामा असलेल्या) रथात बसून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे पोहोचतील. कँटरबरीचे मुख्य बिशप जस्टिन वेल्बी पौराहित्य करतील. राजाला सेंट एडवर्डचा मुकुट घालण्यात येईल. त्याची फ्रेम 2.2 किलो सोन्याने बनवली आहे. त्यात नीलम, गार्नेट, पुष्कराज यांसह अनेक मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. (Kohinoor Diamond)

कॅमिला यांना क्विन मेरीचा मुकुट घातला जाईल; पण त्यात ब्रिटिश राजवटीत भारताकडून लुटण्यात आलेला कोहिनूर हिरा जडवलेला नसेल. मुकुटाच्या रचनेत बदल करण्यात आलेला आहे. हिर्‍यावरून सुरू असलेला वाद त्यामागे कारणीभूत आहे. भारताची नाराजी नको, तसेच सोहळ्यात ब्रिटिश वसाहतवादाची चर्चाही नको म्हणून ही काळजी घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news