Pushpa: The Rise : ‘श्रीवल्ली’वरील ‘त्‍याच्‍या’ डान्सची धूम : ( व्‍हिडीओ व्‍हायरल )

Pushpa: The Rise : ‘श्रीवल्ली’वरील ‘त्‍याच्‍या’ डान्सची धूम :  ( व्‍हिडीओ व्‍हायरल )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
अल्लू अर्जुनच्या पुष्‍पा द राइज (Pushpa: The Rise) चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्याने सेलिब्रेटींसह, देश-परदेशातील क्रिकेटपट्टूनांही ठेका धरलायला लावला आहे. या गाण्यावरील स्टेपवर कठपुतळीने केलेला डान्स सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. टी-सीरिजने आपल्या ऑफीशिअल इंन्स्टाग्राम अकाउंटवर  शेअर केलेला हा व्हिडिओ नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्‍पा द राइज' (Pushpa The Rise) हा चित्रपट दर्शकांना चांगलाच भावला आहे. 'पुष्‍पा' या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्‍स दर्शकांमध्ये  लोकप्रिय ठरत आहेत.  पुष्‍पा चित्रपटातील श्रीवल्‍ली गाण्यावर कठपुतळीचा डान्स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

पुष्पा (Pushpa: The Rise) चित्रपट प्रदर्शित होऊन कित्येक दिवस झाले तरी, यातील डायलॉग्‍स आणि श्रीवल्‍ली गाण्यावरील डान्समुळे हा चित्रपट आजही चर्चेत आहे. या गाण्याने देशातीलच नाही, तर परदेशातील दर्शकांनाही भुरळ घालत, श्रीवल्‍लीवर ठेका धरायला लावला आहे. श्रीवल्‍ली या गाण्याचे देशभरातील हौशी कलाकारांकडून अनेक भाषांमध्ये डबिंग केले जात आहे. हिंदी, मराठी डबिंग व्हर्जन बरोबरच अलिकडील श्रीवल्‍लीचे भोजपुरी व्हर्जन सुद्धा दर्शकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by T-Series (@tseries.official)

हेही नक्की वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news