Punjab ShivSena : खलिस्तानविरोधी मोर्चाची हाक देणाऱ्या नेत्याची पंजाब शिवसेनेकडून हकालपट्टी

Punjab ShivSena : खलिस्तानविरोधी मोर्चाची हाक देणाऱ्या नेत्याची पंजाब शिवसेनेकडून हकालपट्टी
Published on
Updated on

पटियाला; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेच्या पंजाब (Punjab ShivSena) युनिटने शुक्रवारी (दि.२९) पटियाला येथे खलिस्तानविरोधी मोर्चाची हाक देणाऱ्या नेत्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. शुक्रवारी खलिस्तानचे समर्थन करण्यासाठी निहंग शीख समुदायाच्या वतीने गुरपतवंत सिंग पुन्नू यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढला, तर खलिस्तानचा विरोध करण्यासाठी शिवसनेने हरिश सिंघला यांच्या नेतृत्त्वाखाली खलिस्ता मुर्दाबाद म्हणत मोर्चा काढला. हे दोन्ही मोर्चे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने यावेळी हिंसक घटना घडली. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना गोळीबार देखिल करावा लागला.

शिवसनेचे पंजाब (Punjab ShivSena) प्रदेश प्रमुख योगराज शर्मा यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे असे जाहीर केले की, शिवसेनचा कार्यध्यक्षपदी असल्याचा दावा करणाऱ्या हरीश सिंघला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अनिल देसाई यांच्या आदेशावरुन पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हकालपट्टी करण्यावरुन हरीश सिंघला यांना याबाबत विचारणा केल्यावर, सिंघला म्हणाले, माझी पक्षातून हकालपट्टी करण्याचा कोणताही अधिकार योगराज शर्मा यांना नाही. ते पंजाब प्रदेश प्रमुख म्हणून फक्त नव्या सदस्यांना पक्षामध्ये सामावून घेऊ शकतात. पण, माझ्यासारख्या जेष्ठ नेत्याची हकालपट्टी करु शकत नाहीत. तसेच शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) गटाला राज्यातील इतर डझनभर गटांपेक्षा वेगळे व प्रभावी समजले जाते. (Punjab ShivSena)

यावेळी शर्मा यांनी स्पष्ट केले की, आम्ही १० दिवसांपूर्वी पटियाला पोलिसांना स्पष्ट केले होते की हरीश सिंघला यांनी मोर्चाची जी घोषणा दिली त्याच्याशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. तसेच हा सिंघला यांचा वैयक्तिक कार्यक्रम होता, हा पक्षाचा कार्यक्रम नव्हता. (Punjab ShivSena)

सिंघला म्हणाले की, बंदी घातलेल्या शिख फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी हरियाणातील जिल्हा पोलिस कार्यालयांमध्ये खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर सुमारे १५ दिवसांपूर्वी खलिस्तानविरोधी निषेध मोर्चाची घोषणा करण्यात आली होती.

"जर ते विविध कार्यक्रमांमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा देऊ शकतात, तर आपण खलिस्तानविरोधी घोषणा का देऊ शकत नाही ? पंजाबमधील दहशतवादाच्या वेळी हजारो हिंदू मारले गेले," असा सवाल यावेळी सिंघला यांनी करत पुढील कृती ठरवण्यासाठी त्यांनी एक बैठक बोलावल्याचे सांगितले.

पंजाबमध्ये शिवसेनेचे (Punjab ShivSena) विविध गट कार्यरत आहेत. त्यामध्ये शिवसेना (केसरी), शिवसेना (भगवा), शिवसेना (तकसाळी), शिवसेना पंजाब, राष्ट्रवादी शिवसेना, शिवसेना (अमृतसर), शिवसेना (इन्कलाब), शिवसेना (हिंद), शिवसेना (हिंदुस्थान) आणि शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) अशी माहिती शिवसेनेचे प्रसिद्धी सचिव जुगलकिशोर लूंबा यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news