Punjab Government : पंजाब सरकारने इंटरनेट-एसएमएस सेवेवरील बंदी वाढवली

Punjab Government : पंजाब सरकारने इंटरनेट-एसएमएस सेवेवरील बंदी वाढवली

पुढारी ऑनलाईन : खलिस्तान समर्थक आणि 'वारस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या अटकेसाठी पंजाब सरकार आणि पोलिसांकडून युद्ध पातळीवर कारवाई सुरू आहे. दरम्यान, आज (दि २०) सकाळी अमृतपाल सिंगचा ड्रायव्हर आणि काका हरजीत सिंग यांनी पंजाब पोलिसांसमोर शरणागती पत्‍करली. पंजाब सरकारने नोटीस जारी करत सार्वजनिक सुक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा राज्यातील इंटरनेट-एसएमएस सेवा बंदी वाढवली आहे. मंगळवार, २१ मार्चच्या दुपारपर्यंत राज्यातील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सेवा बंद राहील, असे पंजाब सरकारच्या गृह विभागाने स्‍पष्‍ट केले आहे.

पाकिस्तानी एजन्सींकडून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवत राज्यातील कायदा व सुव्‍यवस्‍था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमधील ही परिस्थिती शांततापूर्ण मार्गाने हाताळण्यासाठी आणि कायदा सुव्यस्था लक्षात घेता, पंजाब सरकारने इंटरनेट आणि दूरसंचार सेवेवर निर्बंध आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार गेले तीन दिवसांपासून पंजाबमधील इंटरनेट-एसएमएस सेवा पूर्णत: बंद ठेवण्‍यात आली आहे.

अफवा आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना इशारा

पंजाब पोलिसांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सना इशारा दिला आहे. विविध देश, राज्ये आणि शहरांमधून येणाऱ्या सर्व खोट्या बातम्या आणि द्वेषयुक्त भाषणांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही  पंजाब पोलीस प्रवक्त्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लंडनमध्ये खलिस्‍तानी समर्थकांना चोख प्रत्‍युत्तर

अमृतपाल सिंग यांच्या समर्थनार्थ  लंडनमधील खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयावरून भारतीय राष्ट्रध्वज उतरवण्याचा प्रयत्न केला. तसेच खलिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. दरम्यान, भारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याने मोठे धाडस दाखवत खलिस्तानींना विरोध केला. खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांकडून खलिस्तानी झेंडा फेकून दिला. या घटनेनंतर खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय उच्चायुक्तालयावर मोठा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news