Punjab Congress News: पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ आमदाराचा ‘आप’मध्ये प्रवेश

Punjab Congress News
Punjab Congress News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाब काँग्रेसचे आमदार डॉ. राजकुमार चब्बेवाल यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या उपस्थितीत त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (Punjab Congress News)

राजकुमार चब्बेवाल हे काँग्रेसच्या तिकिटावर चब्बेवालमधून दोनदा आमदार झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत होशियारपूर मतदारसंघात काँग्रेसचे फक्त राजकुमार चब्बेवाल विजयी झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंजाबमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. (Punjab Congress News)

चब्बेवाल हे दलित समाजाचे मोठे नेते मानले जातात. ते दीर्घकाळ पंजाब प्रदेश काँग्रेसच्या एससी सेलचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. मागील लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती, मात्र भाजपच्या सोमप्रकाश यांनी त्यांचा पराभव केला होता. डॉ. चब्बेवाल हे दोआबातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट असून त्यांची अनेक केंद्रे आहेत. (Punjab Congress News)

हे ही वाचा: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news