MP Santokh Singh Chaudhary
MP Santokh Singh Chaudhary

MP Santokh Singh Chaudhary : भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचे निधन

Published on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन डेस्क – जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाले आहे. (MP Santokh Singh Chaudhary ) भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत ते सहभागी झाले होते. यात्रेत चालत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने तत्काळ त्यांना फगवाडा येथील विर्क रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले. (MP Santokh Singh Chaudhary )

काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत चालत असताना त्यांच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. त्यामुळे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा तत्काळ थांबवली. रुग्णवाहिकेतून त्यांना फगवाडातील विर्क रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. राहुल गांधींची यात्रा सकाळी ७ वाजल्यापासून लुधियानातील लोडोवालपासून सुरू झाली होती. यात्रा सकाळी १० वाजता जालंधरमधील गोराया येथे पोहोचणार होती. दुपारच्या जेवणासाठी येथे थांबणार होते. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा यात्रा सुरू होणार होती. यात्रा सायंकाळी ६ वाजता फगवाडातील बस स्टेशन जवळ थांबली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news