पुणे शहर भाजपची जंबो कार्यकारणी जाहीर 

पुणे शहर भाजपची जंबो कार्यकारणी जाहीर 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांच्या निवडीनंतर सुमारे महिन्याभराने पुणे शहराची जंबो कार्यकारणी आज सकाळी जाहीर करण्यात आली. सरचिटणीस पदी चौघांची नियुक्ती करणार असे सांगितले जात असताना सरचिटणीस पदी आठ जणांना निवडण्यात आलेले आहे. उपाध्यक्ष आणि चिटणीस पदी प्रत्येकी 18 जणांची निवड करण्यात आलेली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यावर भर दिल्याचे दिसून येते. त्याचबरोबर पक्षांतील गटबाजी विचारात घेऊन सर्व गटांना सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

सरचिटणीसपदी यांची निवड :

वर्षा तापकीर (भाजपा महिला आघाडी पुणे शहर प्रभारी )
राजेंद्र शिळीमकर
रवी साळेगावकर
सुभाष जंगले
राघवेंद्र मानकर
पुनीत जोशी
राहुल भंडारे
महेश पुंडे

इतर पदांची विभागणी पुढीलप्रमाणे :

युवा मोर्चा अध्यक्ष : करण मिसाळ

महिला मोर्चा अध्यक्ष : हर्षदा फरांदे

ओबीसी मोर्चा अध्यक्ष : नामदेव माळवदे

अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष : भिमराव साठे

अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष : इमतीयाज मोमीन

व्यापारी आघाडी अध्यक्ष : उमेश शहा

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news