Pune Ganeshotsav 2023 : शिवाजी रस्त्यावरील वाहतुकीत बदल ; बुधवारी रस्ता बंद राहणार | पुढारी

Pune Ganeshotsav 2023 : शिवाजी रस्त्यावरील वाहतुकीत बदल ; बुधवारी रस्ता बंद राहणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम 20 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमात भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत शिवाजी रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

संबंधित बातम्या : 

शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा- जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक उजवीकडे वळून हमजेखान चौकातून सरळ महाराणा प्रताप मार्गावरून गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळून गोटीराम भैया चौकातून डावीकडे वळून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाता येईल.

अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक : अप्पा बळवंत चौक बाजीराव रस्त्याने फुटका बुरूज मार्गे गाडगीळ पुतळा चौकातून उडवीकडे वळून जिजामाता चौक असा प्रवास करता येईल. लक्ष्मी रस्त्यावर विजय मारुती चौक, सोन्या मारुती चौकापासून आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्या वेळी सोन्या मारुती चौक डावीकडे वळून मिर्झा गालिब रस्त्याने उजवीकडे वळून मंडईकडून डावीकडे वळून शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जाता येईल.

Back to top button