पुणे 31.4 तर मालेगावचा पारा 37.4 अंशांवर  : तापमान वाढण्यास सुरुवात

पुणे 31.4 तर मालेगावचा पारा 37.4 अंशांवर  : तापमान वाढण्यास सुरुवात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ढगाळ वातावरण निवळले आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि.4) मालेगावचा पारा राज्यात सर्वाधिक 37.4 अंशांवर गेला, तर पुण्याचे कमाल तापमान 31.4 अंशांवर गेले आहे. राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण कमी झाले. प्रामुख्याने कोकणात कमाल तापमानात वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ अन् मराठवाड्यात तापमान सरासरी इतकेच होते. 5 मार्चपासून राज्यातील वातावरण शुष्क अन् कोरडे राहणार असल्याने तापमानवाढीचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

नाशिक, पुणे सर्वांत थंड

राज्यातील शहरांच्या कमाल व किमान तापमानात वाढ होत असताना किमान तापमानात नाशिक व पुणे शहरांनी आघाडी घेतली आहे. सोमवारी नाशिकचे किमान तापमान राज्यात सर्वांत कमी 12.4, पुणे 13 अंशांवर आले होते. या दोन्ही शहरांचे किमान तापमान महाबळेश्वरपेक्षा कमी ठरले. महाबळेश्वरचे किमान तापमान 14.2 अंशांवर होते.

रात्री अन् पहाटे गारठा

उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाला असून, त्या भागातून शीतलहरी महाराष्ट्राकडे येतच आहेत. तसेच, बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने बाष्पयुक्त वारे हवेच्या वरच्या थरांत जोराने वाहत आहे. त्यामुळे रात्री अन् पहाटेच्या किमान तापमानात घट होत आहे. प्रामुख्याने नाशिक व पुणे शहरात हा प्रभाव प्रकर्षाने जाणवत आहे.

सोमवारचे कमाल व किमान तापमान

मालेगाव 37.4 (14.2), पुणे 31.4 (13), जळगाव 30.3 (13.2), कोल्हापूर 33.6 (18.7), महाबळेश्वर 26.1(14.2), नाशिक 27.8(12.4),
सांगली 34 (18.9), सातारा 33.2 (14.6), सोलापूर 35.7 (21), छत्रपती संभाजीनगर 31.8 (14.2), परभणी 34.4 (19), नांदेड 34.4 (21.4), अकोला 34.2 (17.5), अमरावती 33.6 (18.7), चंद्रपूर 36.8 (20.2)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news