पुढारी ऑनलाईन डेस्क : पुलित्झर विजेती असलेल्या काश्मिरी छायाचित्रकार (Photo Journalist) सना इरशाद मट्टु (Sanna Irshad Mattoo) यांना मंगळवारी (दि.१८) पुन्हा एकदा भारताबाहेर जाण्यापासून दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून रोखण्यात आले. याबद्दलची माहिती मेट्टू यांनी ट्विट करत सांगितली आहे. यापूर्वीही मेट्टू यांना फ्रेंच व्हिसा असूनही इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दिल्लीहून पॅरिसला जाण्यापासून रोखले होते. वाचा सविस्तर बातमी.
माहितीनुसार पुलित्झर विजेत्या काश्मिरी छायाचित्रकार (Photo Journalist) सना इरशाद मट्टु (Sanna Irshad Mattoo) यांना मंगळवारी (दि.१८) दिल्ली विमानतळावर भारताबाहेर जाण्यास दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले आहे. याबद्दल त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी द पुलित्झर प्राईझ ला टॅग करत लिहलं आहे की, "मी न्युयॉर्कला पुलित्झर पुरस्कार घेण्यासाठी जात होते. पण मला दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखले. माझ्याकडे वैध व्हिसा आणि तिकीट असूनही आतंराष्ट्रीय प्रवास करण्यास रोखण्यात आले आहे.
मेट्टू यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, " असं दुसऱ्यांदा झाल आहे की, कारण नसताना मला रोखण्यात आले आहे. काही महिन्यापूर्वीही प्रवास करण्यास रोखलं गेलं होतं. तेव्हा मी काही अधिकाऱ्यांपर्यंत गेले होते पण त्य़ांच्य़ाकडुन कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. आयुष्यात एकदा पुरस्कार कार्यक्रमात सामिल होणार होते.
जुलै २०२२ मध्येही मेट्टू यांना 'सेरेंडिपिटी आर्ल्स ग्रँट 2020'च्या दहा विजेत्यांपैकी एक म्हणून पुस्तक प्रकाशन आणि छायाचित्र प्रदर्शनाला जाण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे जात होत्या. तेव्हा त्यांना इमिग्रेशन अधिकार्यांनी कोणतेही कारण न सांगता आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यास रोखण्यात आले होते. तेव्हा त्यांना सांगण्यात आले होते की, त्या आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकत नाहीत.
सना इरशाद मट्टु (Sanna Irshad Mattoo) यांना मे २०२२ मध्ये पुलित्झर पुरस्कर जाहीर झाला होता. फ्री लान्स छायाचित्रकार असलेल्या मट्टू यांना रॉयटर्सने प्रकाशित केलेल्या त्यांच्या फोटोंसाठी 'फीचर फोटोग्राफी श्रेणीती'ल पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. भारतातील कोरोना दरम्यान केलेल्या उल्लेखनीय छायाचित्रणाबद्दल हा पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचलंत का?