Somnath zende : आधी लाच घेताना सापडला, नंतर झाला थेट करोडपती

Somnath zende : आधी लाच घेताना सापडला, नंतर झाला थेट करोडपती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाला ड्रीम इलेव्हनच (Dream11) दीड कोटींचं बक्षीस लागलं आहे. यामुळे त्यांचं नशीब पालटल आहे. सोमनाथ झेंडे असं त्यांचं नाव असून ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत असतात. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती. अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे.(Dream11)

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहेत. झेंडे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मुख्यालयात कार्यरत असतात. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांनी ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरू केले होतं. त्यांनी कालच बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावरती ड्रीम इलेव्हन ची टीम तयार केली ती अव्वल आली असून त्यामुळे सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहेत. (PSI Somnath zende)

त्यांच्या खात्यावर दोन दोन लाख रुपये येण्यास सुरुवात झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे झेंडे यांच्या कुटुंबात आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे. एकीकडे ड्रीम इलेव्हन सारख्या गेमवर बंदी आणावी अशी मागणी नेहमी होते. परंतु, अशा काही गोष्टी समोर आल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीला देखील करोडपती होता येऊ शकत हे बघायला मिळालं. (PSI Somnath zende)

लाचखोरीचा गुन्हाही दाखल : 

ऑनलाइन गेमच्या माध्यमातून करोडपती झालेले सोमनाथ झेंडे हे चाकण पोलिस ठाणे नेमणुकीस होते. दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एक गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी झेंडे यांनी एकाकडे ८५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी लाचलुचपत विभागाने झेंडे यांच्यासाठी एका खासगी इसमाला पैसे घेताना रंगेहात पकडले. याची दखल घेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी झेंडे यांना तडकफडकी निलंबित केले होते.
दरम्यान, त्यांची नियुक्ती साईड ब्रँच आरसीपी (दंगा काबू पथक) येथे करण्यात आली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news