विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी ६० हजार कोटींची तरतूद ; १२७ किमीसाठीची १३ वर्षांची प्रतीक्षा संपली

विरार अलिबाग कॉरिडॉर
विरार अलिबाग कॉरिडॉर

खारघर, सचिन जाधव : विरार अलिबाग कॉरिडॉरची अखेर 13 वर्षांची प्रतीक्षा संपली असून  एम. एम. आर. डी. ए. यांनी या कॉरिडॉरची मूळतः 2011 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) योजना केली होती. परंतु सप्टेंबर 2020 मध्ये त्याचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडे सुपूर्द करण्यासाठी करार करण्यात आला आहे.

2012 मध्ये या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी फक्त 2,215 कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु आता यामध्ये 10 पटीने वाढ झाली असून हा खर्च 21 ते 22 हजार कोटींच्या घरात गेला आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 12 हजार 554 कोटी रुपये इतकी होती तर 2022 मध्ये 60 हजार 564 कोटी रुपयांपर्यंत म्हणजे 5 पटीने वाढली आहे.

आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी MSRDC ने कंबर कसली असून या प्रकल्पासाठी लागणारा निधी उभारण्याचे काम सुरू केले आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीने तयारी सुरू केली आहे.

आता या नव्या वर्षात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या या कॉरिडॉरचे काम टप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार आहे. येत्या 6 महिन्यांत मोरबे – करंजाडे या 20 किमी लांबीच्या कॉरिडॉरच्या बांधकामाचा श्रीगणेशा होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विरार-अलिबाग हा 127 किमी लांबीचा कॉरिडोर भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण, अलिबाग या क्षेत्रातून जात आहे. तसेच हा रस्ता जेएनपीटी बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी-न्हावा या ट्रान्सहार्बर लिंकला जोडला जाणार आहे.

विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रोजेक्टची वैशिष्ट्ये :

1) विरार ते अलिबागदरम्यानच्या अनेक छोट्या – मोठ्या गावांना जोडणारा आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणारा असा हा मार्ग असणार आहे.

2) 16 लेनची ही ग्रीनफिल्ड महामार्गिका असून या प्रकल्पातील 2 मार्गिका बस -अँम्ब्युलन्ससाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

3) ही ग्रीनफिल्ड महामार्गिका राष्ट्रीय महामार्ग क्र. 8, 3, 4, 4 – B, 17 भिवंडी बायपास व मुंबई – पुणे एक्सप्रेसवेला जोडली जाणार असून मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस – वे मार्गालाही जोडणार आहे.

4) या प्रकल्पाचे आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गिकेत 48 भुयारी मार्ग आणि 41 पूल बांधण्यात येणार आहेत.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news