Kolhapur News | कोल्हापुरात प्रचंड तणाव, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

Kolhapur police
Kolhapur police
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या ठिय्या आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, मटण मार्केट, भाऊसिंगजी रोड परिसरात तणाव निर्माण झाला. या परिसरात जमावाने वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या ठिकाणी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वतः रस्त्यावर उतरून जमावाला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. (Kolhapur News)

दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, जमावाने दीडशेहून अधिक वाहनांची तोडफोड केली आहे. शहरातील चौकाचौकात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात आज बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेत. औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणार्‍या समाजकंटकांना तातडीने अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्‍यातच या ठिकाणी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये धक्‍काबुक्‍की झाली. यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.

छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते याच्यामध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यावेळी जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी महापालिका चौक, शिवाजी चौक या रोडवर प्रचंड धापवळ झाली.

दरम्‍यान महापालिका चौकात जमाव आणि पोलिस आमनेसामने आल्‍याने परिस्‍थिती स्‍फोटक बनली. यावेळी पोलिसांच्या लाठीचार्जमुळे धापवळीत चौकात चपलांचा खच पडला आहे. यावेळी वार्तांकन करण्यासाठी आलेल्‍या पत्रकारांनाही पोलिसांचा लाठीमार बसला. दरम्‍यान, श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांनाही या घटनेचा फटका बसला. (Kolhapur News)

गेल्या चार-पाच दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल होत असल्याने लक्ष्मीपुरी, शाहूपुरीसह काही भागात तणाव होता. मात्र सोमवारी रात्री उशिरा काही समाजकंटकांनी मोबाईलवर औरंगजेबाच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक बनले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news