नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणी प्रा. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता – GN Saibaba acquitted

नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणी प्रा. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता – GN Saibaba acquitted

पुढारी ऑनलाईन – नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक गोकरोकोंडा नागा साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०१७मध्ये जिल्हा न्यायालयाने प्रा. साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (GN Saibaba acquitted)

नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव आणि अनिल पानसरे यांनी हा निकाल दिला.

गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने २०१७मध्ये प्रा. साईबाबा यांना दोषी ठरवले होते. माओवाद्यांशी संबंध ठेवणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे असे आरोप त्यांच्यावर होते. प्रा. साईबाबा यांची त्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारगृहात रवानगी करण्यात आली होती.

५५ वर्षीय साईबाबा व्हीलचेअरवर आहेत. त्यांचे शरीर ९० टक्के अपंग आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले. खंडपीठाने या प्रकरणातील अन्य पाच दोषींच्या अपीललाही परवानगी दिली. अपीलाची सुनावणी सुरू असताना पाचपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

जर इतर कोणते दोषारोप नसतील तर प्रा. साईबाबा यांना तातडीने तुरुंगातून मुक्त करावे, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news